0
BY - युवा महाराष्ट्र लाइव – पुणे  |

अल्पावधीतच ‘चहाप्रेमीं’मध्ये प्रसिद्ध झालेल्या ‘येवले अमृततुल्य चहा’ला  अन्न आणि औषध प्रशासनाने दणका दिला आहे. पुण्यातील नमुन्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर त्रुटी आढळल्यामुळे ‘येवले अमृततुल्य चहा’चे राज्यभरातील उत्पादन आणि विक्री बंद ठेवण्याचे आदेश एफडीएने दिले आहेत. त्यामुळे चहाप्रेमी काहीसे खट्टू झाले आहेत, परंतु सर्व अटींची पूर्तता करण्याची हमी कंपनीच्या संचालकांनी दिली आहे.‘येवले चहा’ची चहा पावडर, साखर, चहाचा मसाला असा एकूण सहा लाख रुपये किमतीचा साठा पुण्यातून जप्त करण्यात आला आहे. विक्रीसाठी पॅकबंद करुन ठेवण्यात आलेला माल अन्न आणि औषध प्रशासनाने जप्त केला आहे. त्याचबरोबर पुढील आदेशापर्यंत उत्पादन आणि विक्री बंद ठेवण्याचा आदेश दिला आहे. जनहित आणि आरोग्याच्या दृष्टीने ही कारवाई करण्यात आली आहे.

Post a comment

 
Top