0
BY – युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई  |
मुंबईतील क्रॉफर्ड मार्केट परिसरात असलेल्या एका इमारतीचा काही भाग कोसळला आहे. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या सात गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. दक्षिण मुंबईत असलेल्या युसूफ इमारतीचा काही भाग रात्रीच्या सुमारास कोसळला. या इमारतीत अनेक दुकाने होती. मुंबई पोलीस आयुक्तालयाजवळ ही इमारत आहे.इमारतीच्या ढिगाऱ्याखाली काही लोक अडकलेले होते. त्यांना बाहेर काढण्यात अग्निशमन दलाच्या जवानांनी यश आले आहे. इमारतीचा भाग कोसळून ढिगाऱ्याखाली अजूनही काही लोक अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले असून ढिगाऱ्या बाजुला करण्याचे काम सुरू आहे. 

Post a comment

 
Top