0
BY – युवा महाराष्ट्र लाइव – नवी दिल्ली  |
पंतप्रधान नरेंद्र मोदी थोड्या वेळातच मथुरा येथील वेटरनरी विद्यापीठात पशु आरोग्य संमेलनाचे उद्घाटन करणार आहेत. यासोबतच पशुंना होणाऱ्या वेगवेगळ्या आजारांच्या टीकाकरण कार्यक्रमाचीही सुरुवात करणार आहेत. पंतप्रधान मोदी देशभरातील 40 मोबाइल पशु चिकिस्ता वाहनांना हिरवा झेंडा दाखवून त्यांना रवाना करणार आहेत. यासोबतच पंतप्रधान मोदींनी प्लास्टिकचा वापर कमी करण्याचे आवाहन केले. या दरम्यान उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह यांचीही उपस्थिती होती.

Post a comment

 
Top