0
BY - युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई |
शिक्षण सेवक भरती प्रक्रियेतील गैरव्यवहार टाळण्यासाठी आणि निवड प्रक्रिया पारदर्शक होण्यासाठी राज्य शासनामार्फत पवित्र प्रणाली आणण्यात आली. ऑनलाईन पद्धतीने शिक्षण सेवक भरती करण्याचा हा उपक्रम अन्य राज्यांसाठीही पथदर्शी ठरेल, असे शालेय‍ शिक्षण व क्रीडा मंत्री ॲड.आशिष शेलार यांनी सांगितले.
      शालेय शिक्षण व क्रीडा विभागामार्फत पवित्र पोर्टलद्वारे निवड झालेल्या महाराष्ट्रातील शिक्षकांना नियुक्तीपत्र देण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री विनोद तावडे, शालेय शिक्षण विभागाचे सचिव सौरभ विजय, शिक्षण आयुक्त विशाल सोलंकी, पालघर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी महेंद्र वारभुवन उपस्थित होते. पवित्र प्रणालीदवारे भरती करण्यात आलेल्या 5 हजार 51 उमेदवारांपैकी 22 शिक्षण सेवकांना नियुक्तीपत्र प्रातिनिधीक स्वरुपात मंत्रालयात देण्यात आले.
ॲड. शेलार म्हणाले, राज्यातील शिक्षकांची भरती ही ऑनलाईन पद्धतीने पवित्र पेार्टलच्या माध्यमातून होणारी पहिलीच भरती आहे. या भरतीमुळे शिक्षण सेवक भरती प्रक्रियेत होणारी अनियमितता दूर होण्यास मदत होणार आहे तसेच विद्यार्थ्यांना  गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळणार आहे.

Post a comment

 
Top