0
BY - नामदेव शेलार,युवा महाराष्ट्र लाइव - मुरबाड |
स्वताला आपण फार स्वच्छ नेते आहोत असे भासवणारे राज्याचे मुख्यमंत्री आणि मुरबाडचे लोकप्रतिनिधी यांच्या दबंगशाही अर्शिवादाने मुरबाड सार्वजनिक बांधकाम  ऑनलार्इन टेंडर न काढता लाखोच्या मॅनेजमेंटने 10 ते 40 लाख त्यापुढे कोटी रूपयाच्या कामाची वर्क ऑडर बनवुन प्रचंड भ्रष्टाचार सुरू आहे.मुरबाड मध्ये गेल्या 19 ऑगस्ट 2019च्या दरम्यान मुरबाड मधील शिवाजीचौक आणि मुरबाड पोलिस ठाण्याच्या उदघाटणासाठी आले होते .मुख्यमंत्री मुरबाडला येणार म्हणुन मुरबाड सार्वजनिक बांधकाम विभागानी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयाला  रंगरंगोटी करून फर्निचर दरवाजे दुरूस्ती केली त्यावर 2 लाखाच्या आत खर्च झाला परंन्तु या विश्रामगृहात मुख्यमंत्री आलेच नाहीत परंन्तु सार्वजनिक बांधकाम विभागाचे ठाणे कार्यकारी अभियंता दळवी कल्याणचे उपअभियंता शिरसाठ मुरबाड सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाखा अभियंता आलटे ठाणे येथील टेंडर क्लार्क निकम ठाणे कार्यालयातील र्इस्टीमेंन्ट तपासणारे अधिकारी यांनी ठेकेदारांशी संगणमत  ऑफलार्इन टेंडर केला आहे.त्यामध्ये लाखोचा भ्रष्टाचार झाला आहे.त्याची चौकशी शासनाने करावी अशी मांगणी जेष्ठ पत्रकार नामदेव शेलार यांनी राज्य व केंन्द्र सरकारकडे केली आहे.मुख्यमंत्री येवुन काही काळ गेला असताना मुरबाड सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाखा अभियंता यांनी आपले ऑफिस आलिशान बनवण्याचे काम सुरू केले आहे.मुख्यमंञ्याच्या नांवाने आणलेला फर्निचर अधिकार्‍यांनी घरी  असल्याचा संशय असुन ठाणे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिक्षिक अभियंता कार्यकारी अभियंता दळवी मुरबाड उपअभियंता शाखा अभियंता कल्याण उपअभियंता यांनी तसेच प्रत्येक कामाच्या टेंडरवर टक्केवारी घेवुन प्रत्येक वर्षात 2000 ते 3000 कोटीच्या निधीतुन टेंडर क्लार्क कार्यकारी अभियंता आणि बिल तपासणीक जैसवाल टेंडर बिल तपासणीक अधिकारी गुणंवत विभाग बिलावर सहया करणार्‍यांनी  रूपये टक्केवारीने वसुल केले आहेत त्याची चौकशी सीबीआय मार्फत करावी अशी मांगणी जेष्ठ पत्रकार नामदेव शेलार यांनी केंन्द्र सरकार राष्ट्रपती यांच्याकडे केली आहे.मुरबाड शहरातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या नियंत्रणाखाली केलेली बोगस कामे असून कामे मोजमापे प्रमाणे केलेली नाहीत गटारी अपुर्ण असुन रस्ते उखडले आहेत.पिव्हर ब्लॉकची कामे बोगस केली असुन मुरबाड  शेकडो रस्तेवर दरवर्षी विविध शेडमधुन कोटी रूपायाचा भ्रष्टाचारकेला आहे.त्याकडे सत्ताधारी लोकप्रतिनिधी व राज्य सरकारने दुर्लक्ष केल्याने केंन्द्राकडे चौकशीची मांगणी केल्याचे तक्रारदारानी पत्रकारांशी बोलताना सांगितले.ट्रामाक्रेअर हॉस्पीटल काम अद्याप अपुर्ण आहे.ज्याकामाच्या इस्ट्री़मेंन्टमध्ये लादया खिडक्या दरवाजे शौचालय स्टार्इल असा उल्लेख होता त्याची कामे न करता बिले काढली त्यानंतर त्याच अपुर्ण असलेल्या ट्रामाक्रेअर  टेंडर 26 लाख रूपये र्इस्ट्रीमेंन्ट बनवुन अधिकार्‍यांनी भ्रष्टाचार केला आहे.त्यांचाही ऑनलार्इन टेंडर झालेला नाही.सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकार्‍यांना तसेच मुरबाडच्या शाखा अभियंता यांना जेवणावळीपाटर्या टक्केवारी देवुन आचारसहिंता लागण्यापुर्वी टेंडर मंजुर केल्याचे समजते याकडे वरिष्ठ अधिकार्‍यांचे दुर्लक्ष झाले आहे.मुरबाड सार्वजनिक बांधकाम विभागात नुकतेच रूजू झालेल्या शाखा अभियंता यांनी बिनधास्त आपल्या आलीशान  काम सुरू केले आहे.कपाट टेबल दरवाजे बनवले असुन लोखंडीपत्राशेड तयार केले आहे.ही कामे मुख्यमंत्री येणार म्हणुन निधी खर्च दाखवुन स्टोअर टेंडर नावाखाली केली आहेत.टेंडर वर्क ऑडर नसताना उदघाटणे गेल्यावर्षी झालेल्या कामाचे पुन्हा उदघाटणे अशी बनवाबनवी निवडणुक काळात सुरू असुन आचारसहिंते पुर्वी नारळ फोडुन अधिकार्‍यांनी प्रताप केला आहे.मुरबाड तालुक्यातील कामाची  झाल्यास 100 कोटीच्यावर भ्रष्टाचार उघड होर्इल .टक्केवारीने ठेकेदार आणि अधिकारी यांचा सार्वजनिक बांधकाम ठाणे कार्यालय तसेच मुरबाड उपअभियंता कार्यालय अडडा बनला आहे.मुरबाडच्या शासकीय विश्रामगृहात पत्रकाराना बंदी घालुन राजकारण्याना शाखा अभियंता आलटे यानी विश्रामगृह राजकीय अडडा बनवुन दिला आहे.त्यांच्या विरोधात सामाजिक संघटना उग्र आंदोलन पुढील काळात करणार असल्याची चर्चा आहे.(भाग 2) 

Post a comment

 
Top