0
BY - युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई  |
महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेत 25 हजार कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा शरद पवार, अजित पवार यांच्यासह अन्य 70 जणांवर ठपका ठेवण्यात आला आहे. या आरोपांनंतर मंगळवारी ईडीने राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, अजित पवार यांच्यासह अन्य 70 जणांवर गुन्हा दाखल केला आहे. आता या कारवाईनंतर शरद पवार पत्रकार परिषद घेत आहेत. या प्रकरणी ते शुक्रवारी ईडीच्या कार्यालयात जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.शरद पवार पत्रकारांशी बोलताना म्हणाले की, ही अतिशय छोटी पत्रकार परिषद आहे. मंगळवारी संध्याकाळपासून सर्व प्रसारमध्यमांसमोर एक बातमी चालू होती. ज्यामध्ये ईडीने राज्य सहकारी बँक संदर्भांत गुन्हा दाखल केला ज्यात माझंही नाव आहे. माझ्या आयुष्यातला हा दुसरा प्रसंग आहे. 1986 सली एका आंदोलनामुळे मला अटक झालेली होती. ईडीने गुन्हा दाखल केलेला आहे यावर माझी स्वतःची भूमिका आहे. की जी तपास यंत्रणा आहे तिला पूर्णपणे सहकार्य करणार आहे. नक्की गुन्हा काय आहे याचा तपास व्हावा यासाठी मदत करेल. एक महिना निवडणुकीच्या प्रचारासाठी मी संपूर्ण महाराष्ट्रभर फिरणार आहे. त्यामुळे बरेच दिवस मी मुंबईच्या बाहेर असणार आहे. त्यामुळे अशा अवस्थेत मला जर ईडीने काही संदेश पाठवला आणि मी जर मुंबईत उपस्थित नसेन तर मी अदृश्य झालो अस म्हणायला नको असा टोलाही त्यांनी यावेळी भाजपला लगावला.

Post a comment

 
Top