0
BY - मन्साराम वर्मा,युवा महाराष्ट्र लाइव – ठाणे |
ठाणे जिल्ह्यातील १८ विधानसभा मतदार संघात निवडणुक प्रक्रिया सुरळीतपणे राबिवण्यासाठी विविध यंत्रणा कार्यान्वित करण्यात आल्या आहेत. या निवडणुकीत जास्तीजास्त मतदारांना सहभागी होता यावे व कुणीही मतदाना पासून वंचित राहू नये यासाठी नियोजन करण्यात आले आहे. असे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राजेश नार्वेकर यांनी येथे सांगितले. विधानसभा निवडणूक २०१९ च्या कार्यक्रमाच्या संदर्भात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी अपर जिल्हाधिकारी वैदही रानडे, उप जिल्हा निवडणूक अधिकारी अपर्णा सोमाणी आरोलकर उपस्थित होते.
विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी नार्वेकर यांनी समिती सभागृहात पत्रकारांशी दिलखुलास संवाद साधला. निवडणुकीच्या तयारी संदर्भात विविध मुद्द्यांवर त्यांनी भाष्य केले. निवडणुकीच्या दरम्यान जिल्ह्यात १९५० हेल्पलाईन, सी व्हीजिल मोबाईल ऍप, भरारी पथके, सीसीटीव्ही यंत्रणा अशा विविध तंत्रज्ञानाच्या माध्यमातून देखरेख व नियंत्रण ठेवले जाईल. राजकीय पक्षांचे  प्रतिनिधी, पोलीस यंत्रणा तसेच जिल्हा प्रशासन यांच्यात समन्वयातून  निर्भय आणि मुक्त वातावरणात निवडणुका होतील असा विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केला. तसेच राजकीय पक्षांनी प्लस्टिकचा वापर टाळून निवडणूक प्रचार साहित्य हे पर्यावरण पूरक असेल या दृष्टीने प्रयत्न करावा. असेही ते म्हणाले  

Post a comment

 
Top