0
BY - युवा महाराष्ट्र लाइव – ठाणे |
कालपासून ठाणे, मुंबईत सुरू असलेला  पाऊस अजूनही सुरुच आहे. मुसळधार पावसामुळं मुंबईतल्या सखल भागात  पाणी साचलं आहे. पावसामुळे मध्य आणि हार्बर मार्गावरील वाहतूक 10 ते 15 मिनिटं उशिरानं सुरु आहे. पश्चिम रेल्वेची वाहतूक सध्या सुरळीतपणे आहे.मुसळधार पाऊसामुळे सकाळी कामावर जाणाऱ्या चाकरमान्यांना  चांगलाच त्रास सहन करावा लागत आहे
भिवंडीत 2 दिवसांपासून सुरु असलेल्या संततधार पावसामुळे कामवारी नदीची पाणी पातळी वाढली आहे. शहरातल्या अनेक सखल भागात पाणी साचलं आहे. भिवंडी-वाडा राज्य मार्गावरच्या शेलार गावातही 2 ते 3 फुटापर्यंत पाणी साचलं होतं. अनेक घरांत आणि दुकानात पाणी शिरल्यानं नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.  कामवारी नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.येत्या 24 तासात  महाराष्ट्रात जोरदार पावसाचा इशारा हवामान खात्यानं दिला आहे

Post a comment

 
Top