0
BY - युवा महाराष्ट्र लाइव – सातारा |
नुकतेच भाजपवासी झालेले साताऱ्याचे माजी खासदार उदयनराजे भोसले यांच्या सुपुत्राने अभिमानास्पद कामगिरी बजावली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे थेट चौदावे वंशज असलेल्या वीरप्रताप भोसले यांनी आशियाई स्कुबा डायव्हिंग स्पर्धेत वयाच्या अवघ्या चौदाव्या वर्षी प्रमाणपत्र मिळवलं आहे.वीरप्रताप भोसले यांनीही आपल्या घराण्याच्या प्रतिष्ठेला साजेशी कामगिरी केल्याचं दिसत आहे. नुकतंच थायलंडमधील फुकेतमध्ये आशियाई स्कुबा डायव्हिंग स्पर्धा झाली होती. यामध्ये 14 वर्षीय वीरप्रताप सहभागी झाले होते. त्यांनी स्कुबा डायव्हिंगचं प्रमाणपत्र मिळवल्याची माहिती उदयनराजेंनी दिल्याचं काही मीडिया रिपोर्ट्समध्ये म्हटलं आहे.

Post a comment

 
Top