0
BY – युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई |
पालघर जिल्ह्याच्या विक्रमगड तालुक्यातील देहरजी मध्यम प्रकल्प मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) अर्थसहाय्यातून राबविण्यास सोमवारी (9 सप्टेंबर 2019) मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.देहरजी प्रकल्पाच्या माध्यमातून एमएमआरडीएला 93.22 द.ल.घ.मी. पाणी उपलब्ध होणार असून यामुळे पालघर जिल्ह्यातील महापालिका आणि गावांच्या पिण्याच्या पाण्यासह औद्योगिक वापरासाठीच्या पाण्याचा प्रश्न सुटणार आहे. यापूर्वी 4 मार्च 2014 च्या शासन निर्णयानुसार वसई विरार शहर महानगरपालिकेसाठी या प्रकल्पातून पाणी आरक्षित करण्यासह प्रकल्पाचा संपूर्ण खर्च भांडवली अंशदान म्हणून या महापालिकेकडून घेण्यात येणार होता. तसेच त्याची अंमलबजावणी कोकण पाटबंधारे विकास महामंडळाकडून करण्यास मान्यता देण्यात आली होती.दरम्यानच्या काळात दरसूचीतील बदल, भूसंपादन खर्चातील वाढ, प्रकल्पाच्या आराखड्यातील बदल इत्यादी कारणांमुळे प्रकल्पाच्या किंमतीत वाढ झाली आहे. वाढीव किंमतीनुसार वसई विरार महानगरपालिकेकडून निधी उपलब्ध करून देणे शक्य होणार नाही. यामुळे देहरजी प्रकल्प मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या अर्थसहाय्यातून राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Post a comment

 
Top