0
BY - युवा महाराष्ट्र लाइव – सातारा  |
राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांचा भाजप प्रवेश नक्की झाला आहे.  उदयनराजे आज संध्याकाळी आपल्या खासदारकीचा राजीनामा देणार असून त्यासाठी ते दिल्लीला रवाना झाल्याची माहिती समोर आली आहे. मागच्या काही दिवसांपासून उदयनराजेंचा भाजप प्रवेशाचा सस्पेन्स आता संपला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची गुरुवारी भेट घेतल्यानंतर उदयनराजेंनी आपल्या भाजप प्रवेशावर शिक्कामोर्तब केले. खासदारकीचा राजीनामा दिल्यानंतर उदयनराजे यांचा उद्या भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्य उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश करतील. रविवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेतही ते सहभागी होणार असल्याची माहिती सूत्रांकडून समजली आहे.

Post a comment

 
Top