0
BY – युवा महाराष्ट्र लाइव – डोंबिवली |
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारच्या गड-किल्ले भाड्याने देण्याच्या धोरणावर महाराष्ट्रभरातून टीका होत आहे. आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष (MNS) राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी देखील सरकारच्या भूमिकेवर सडकून टीका केली आहे. सरकारला उत्पन्नच मिळवायचे असेल, तर त्यांनी मंत्र्यांचे बंगले भाड्याने द्यावेत, अशा शब्दात राज ठाकरेंनी गड-किल्ले धोरणाचा समाचार घेतला. राज ठाकरेंनी आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षबांधणीला सुरुवात केली आहे. त्याचाच भाग म्हणून त्यांनी पदाधिकाऱ्यांच्या भेटीगाठींना सुरुवात केली. आज (7 सप्टेंबर) ते डोंबिवलीतील पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेणार होते. मात्र, बैठकीसाठी येताना राज ठाकरेंच्या गाड्यांचा ताफा वाहतूक कोंडीत अडकला. त्यामुळे आजची बैठक रद्द करण्यात आली आहे.

Post a comment

 
Top