0
BY – युवा महाराष्ट्र लाइव – यवतमाळ  |
येत्या विधानसभा निवडणुकीतील यवतमाळ मतदार संघातील प्रहार जनशक्ती पक्षाचे संभाव्य उमेदवार बीपीन चौधरी यांची संवादयात्रा मतदार संघाच्या ग्रामिण भागामध्ये आज पासून सुरु होत आहे. ९, १० आणि ११ तारखेला तीन दिवस  पक्षाच्या सहकार्यांसह ३९ गावांना भेटी देवून जनतेच्या समस्या जाणून घेणार आहेत अशी माहिती आज विश्रामगृहात आयोजित पत्रपरिषदेत बिपिन चौधरी यांनी दिली.
यवतमाळ विधानसभेतील मतदार संघातील किन्ही अर्जुना, हिवरी, नाकापार्डी, लोणी घाटाणा, पपरी, अकोलाबाजार, बारडतांडा, बोरीसिंह, रुई वाई, बेलोरा, मांगुळ भांब अशा पंधरा गावांना ९ तारखेला भेटी देवून अकोलाबाजार येथे चार वाजता तर रुई येथे ७ वाजता जाहिर सभा होईल दुसरे दिवशी 10 तारखेला महागाव, देउरवाडी, वडगाव (गाडे), सावंगी, सावळा, पाथ्रदेवी, बोथगव्हाण, पांढुर्णा, तपोना, बोरी अरब, लाडखेड, कामठवाडा, चाणी, तिवसा या  गावांना भेटी देवून देउरवाडी १० वाजता, बोरी अरब ४ वाजता, तिवसा ७ वाजता जाहिर सभा तर तिसरे दिवशी ११ तारखेला पारवा, तळेगाव भारी, शिवणी,चिचघाट, धरमगाव,वडनेर, रामवाकडी, येळाबारा, दहेली,सुकळी,धानोरा(वड), गणेशपूर,वडगाव पो.स्टे, कारेगाव, कोळंबी, पांढरी, सावरगढ, बोथगव्हाण, धानोरा, भोसा अशा विस गावांना भेटी देवून सायंकाळी ५ वाजता येळाबारा येथे जाहिर सभा घेणार आहेत.ग्रामीण भागातील पाणी टंचाईचा अस्वच्छतेचा आरोग्याच्या शासकीय योजनेतील अपयशासंबधीच्या जनतेच्या समस्या जाणून घेवून यात्रेनंतर त्या सोडविण्याचे दृष्टीने प्रयत्न करण्यात येणार असल्याची माहिती चौधरी यांनी दिली. संवादयात्रेची जय्यत तयारी पक्षातर्फे करण्यात आली २०० ते २५० कार्यकर्ते या यात्रेत सामिल होणार आहे. बिपीन चौधरी विधानसभा मतदार संघाचे पक्षाचे प्रमुख असून तेच पक्षाचे संभाव्य उमेदवार आहेत. ग्रामीण भागानंतर शहरी भागातील संवादाचे नियोजन करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगीतले. यावेळी  रितेश बोबडे दिपक चेके, आकाश चंदनखेडे, विशाल जाधव, हितेश जाधव, निलेश राठोड, निलेश चरडे उपस्थित होते.

Post a comment

 
Top