0
BY - युवा महाराष्ट्र लाइव – कोल्हापूर  |
जिल्ह्यात मागील तीन ते चार दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत असून यामुळे अनेक नद्यांच्या पात्रात पाण्याची वाढ झाली आहे. 24 तासांत पंचगंगेच्या पाणी पातळीत 6 फुट 7 इंचांची वाढ झाली आहे. राधानगरी धरणांचे 4 स्वयंचलित दरवाजे उघडण्यात आले असून 52 बंधारे पाण्याखाली आहेत. धरणं पाणलोट क्षेत्रात पावसाची जोरदार बॅटिंग सुरू आहे. पंचगंगेची पाणी पातळी 32 फूट 8 इंचाच्या वर असल्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. गगनबावडा तालुक्यात अतिवृष्टीची नोंद झाली आहे.

Post a comment

 
Top