0
BY - सुहास रेळेकर,युवा महाराष्ट्र लाइव – ठाणे |
महाराष्ट्र विधान सभेत वृत्तपत्र विकेर्त्यांचे प्रश्न उपस्थित करून न्याय मिळवून देणाऱ्या आमदार संजय केळकर यांची ऑल इंडिया न्यूज पेपर डिस्ट्रीब्यूशन असोसिएशनच्या राष्ट्रीय मुख्य सल्लागार पदी नियुक्ती करण्यात आली आहे .
आमदार संजय केळकर राज्यभरातील वृत्तपत्र विक्रेत्यांच्या प्रश्नाबाबत विधानसभेमध्ये नेहमी बोलत असतात.महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटना गेल्या दहा-बारा वर्षांपासून कल्याणकारी मंडळ बाबत आग्रही होती याविषयी आमदार संजय केळकर यांनी विधानसभेमध्ये प्रश्न उपस्थित करून कल्याणकारी मंडळाचा प्रश्न मंजूर करून घेतला शिवाय वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी वेगळी अभ्यास समिती ही स्थापन करून घेतली.वृत्तपत्र विक्रेत्यांच्या स्टॉलवर होणाऱ्या कारवाईबाबत ही विधानसभेत प्रश्न उपस्थित करून त्यांनी स्टॉलाही संरक्षण मिळवून दिले. वृत्तपत्र विक्रेत्यांना देखील परवडणारी  स्वस्त घरे मिळावीत म्हणूनही ते आग्रही आहेत. वेळोवेळी वृत्तपत्र विक्रेत्यांच्या विविध मागण्यासाठी नेहमी ते पाठपुरावा करत असतात, म्हणून त्यांचे राष्ट्रीय कमिटी सल्लागार पदी नियुक्ती करावी अशी सूचना राज्य संघटनेचे सरचिटणीस बालाजी पवार व कार्याध्यक्ष सुनील पाटणकर यांनी सुचवली होते,याचीच दखल घेऊन ऑल इंडिया न्यूजेपर डिस्ट्रीब्यूशनच्या वतीने आमदार संजय केळकर यांची  राष्ट्रीय मुख्य सल्लागार म्हणून नेमणूक करण्यात आली यावेळी राष्ट्रीय कार्यकारिणीचे चेअरमेन संजीव केरणी, संयोजक राकेश पांडे, विमल पांडे राज्य संघटनेचे अध्यक्ष हरी पवार यांच्या उपस्थित आमदार संजय केळकर याना नियुक्तीपत्र देण्यात आले .
यावेळी बोलताना आमदार  संजय केळकर यांनी सांगितले  महाराष्ट्र बरोबर आता  देशभरातील वृत्तपत्र विक्रेत्यांच्या अडीअडचणी व प्रश्न सोडवण्यासाठी मी नेहमी प्रयत्नशील असेल असे सांगितले. हा कार्यक्रम पार पाडण्यासाठी ठाणेशहर वृत्तपत्र विक्रेता असोसिएशनचे अध्यक्ष दत्ता घाडगे, दिलीप चिंचोलेे, विवेक इसामे व इतर पदाधिकारी यांनी आयोजन केले.

Post a comment

 
Top