0
BY - युवा महाराष्ट्र लाइव – सातारा |
आमदार फंडासह विविध शासकीय योजनांच्या माध्यमातून भरीव निधी उपलब्ध करुन श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी सातारा- जावली मतदासंघात विकासकामांचा झंजावात सुरु ठेवला असून जावली तालुक्यातील प्रमुख दोन रस्त्यांच्या कामासाठी शिवेंद्रसिंहराजे यांनी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून तब्बल ६ कोटी ७८ लाखाचा निधी मंजूर करुन घेतला आहे. हे दोन्ही प्रमुख मार्ग असल्याने या कामांसाठी भरीव निधी उपलब्ध करुन दळणवळणाचा प्रश्‍न निकाली काढल्याबद्दल समस्त जावलीकरांमधून समाधान व्यक्त होत आहे.
मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून जावली तालुक्यातील पुणे बंगळूर महामार्ग (एन.एच.४) ते रायगाव आणि कुडाळ ते सर्जापूर या रस्त्याला निधी मिळावा यासाठी शिवेंद्रसिंहराजे यांच्या सुचनेनुसार आणि लेखी पत्रानुसार बांधकाम विभागाच्या अधिकार्‍यांनी प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठवला होता. हा प्रस्ताव मंजूर करुन घेण्यासाठी शिवेंद्रसिंहराजे यांनी पाठपुरावा केला आणि या दोन्ही कामांसाठी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून ६ कोटी ७८ लाखाचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
महामार्ग ते रायगाव या रस्त्यासाठी (२.३० किमी) २ कोटी ४३ लाख ९९ हजार रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे. कुडाळ ते सर्जापूर (३.१० किमी) या रस्त्यासाठी ३ कोटी ५६ लाख ७९ हजार रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे. मंजूर निधीतून या दोन्ही रस्त्यांचे मजबुतीकरण, खडीकरण आणि डांबरीकरण केले जाणार आहे. निवीदा प्रक्रीया व इतर शासकीय सोपस्कार पुर्ण करुन तातडीने काम सुरु करा आणि कामे दर्जेदार करा, अशा सक्त सुचना शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी संबंधीत अधिकार्‍यांना केल्या आहेत. 

Post a comment

 
Top