0
BY - युवा महाराष्ट्र लाइव – अहमदनगर |
नगर-दौंड महामार्गावर बाबुर्डी बेंद परिसरात ट्रक आणि कारचा भीषण अपघात झाला. या अपघातात चार जण जागीच ठार झाले आहेत. कार मधील चार जण श्रीगोंदयाहून नगरकडे येत असताना हा अपघात झाला. गुरुवारी पहाटे अडीचच्या सुमारास ही घटना घडली.नगर दौंड महामार्गावरील बाबुर्डी बेंद परिसरातील महादेव वस्ती जवळ ट्रक (एमपी 09 एचएच 8378) व कार (एम एच 04 बिवाय 4857) धडकल्याने हा अपघात झाला. श्रीगोंद्याहून नगरकडे येत असताना हा अपघात झाला. अपघाताची माहिती मिळताच पोलीसांनी आणि स्थानिकांनी येथे धाव घेतली.

Post a comment

 
Top