0
BY – युवा महाराष्ट्र लाइव – डोंबिवली  |

डोंबिवली एमआयडीसीत अनेक रासायनिक कंपन्या असून यामुळे डोंबिवलीकरांना नेहमीच प्रदूषणाचा त्रास सहन करावा लागतो. यापूर्वी काही वर्षांपूर्वी डोंबिवलीत हिरवा पाऊस पडला होता. तर मागच्याच वर्षी एमआयडीसीच्या दावडी गावात गणेशमूर्ती काळवंडल्याचा प्रकार घडला होता. नाल्यात हिरवं, लाल रंगाचं पाणी येणं, घरातल्या भांड्यांवर काळ्या पावडरचा थर जमणं हे प्रकारही डोंबिवलीकरांना नवीन नाहीत. त्यातच आज सकाळी डोंबिवली एमआयडीसी भागात पाउस पडत असताना या पाण्यावर तेलाचा तवंग असल्याचं काही कंपनीमालकांना आढळून आलं. या पाण्याचे नमुनेही घेऊन ठेवण्यात आले असून प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे याची तक्रार करण्यात आली आहे. हा प्रकार प्रदूषणामुळेच घडल्याचा स्थानिकांचा दावा असून आसपासच्या कंपन्यांमधून सोडला जाणारा एखादा वायू पाण्याच्या संपर्कात आल्यानं पावसाच्या पाण्यावर हा तवंग आल्याची शक्यता आहे. 

Post a comment

 
Top