0
BY - गौरव शेलार,युवा महाराष्ट्र लाइव – मुरबाड,ठाणे |
ठाणे सिव्हील वैधकीय अधिकारी तसेच ठाणे जिल्हा वरिष्ठ आरोग्य अधिकारी तालुका आरोग्य अधिकारी यांच्या दुर्लक्षने मुरबाड तालुक्यातील साथीच्या रोगावर मातकरण्यास आरोग्य यंत्रणेला अपयश आले आहे.येथील शासकीय सर्वच रूग्णालयात प्राथमिक आरोग्य केंन्द्रात दोन हजाराच्यावर परडे रूग्ण उपचारासाठी येत असुन त्यांच्यावर योग्य उपचार होत नाहीत.कुठे डॉक्टर आहेत तर औषधे नाहीत औधषे आहेत तर डॉक्टर नाहीत असा मनमानी कारभार भाजपा सेना युतीच्या सत्तेत चालला आहे.गोरगरीब रूग्णांना औषधौचार करण्यास पैसा नसल्याने गोरगरीब हैराण झाले आहेत. तसेच मुरबाड शहरातील म्हसा रोड लगत असलेल्या श्री मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल मध्ये शस्त्रक्रिया करण्यासाठी लागणा-या मेडिकल ऑक्सिजनऐवजी इंडीस्ट्रीयल ऑक्सिजनचा वापर केला जात असल्याची धक्कादायक वृत्तसमोर आली आहे.हे गॅस मेडीकल उपचाराचा नसुन चक्क लोखंड वेल्डिंगसाठी  वापरला जात असल्याचे समजत आहे.शासकीय आरोग्य अधिकारी मात्र याकडे का दुर्लक्ष करत आहेत हे गुलदस्त्यात आहे.

Post a comment

 
Top