0
BY - युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई |
नवनियुक्त राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांचे आज येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वागत केले. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर श्री. कोश्यारी यांचे खास विमानाने आगमन झाले. त्यांचे मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. त्यानंतर राजभवन येथे पोलीस पथकाने राष्ट्रीय सलामीच्या मानवंदनेसह श्री. कोश्यारी यांचे स्वागत केले. 
उच्च व तंत्रशिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी श्री. कोश्यारी यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. याप्रसंगी मुख्य सचिव अजोय मेहता, मुख्य राजशिष्टाचार अधिकारी नंदकुमार, पोलीस महासंचालक सुबोधकुमार जयस्वाल, राज्यपालांचे सचिव वेणू गोपाल रेड्डी आदी मान्यवर उपस्थित होते.

Post a comment

 
Top