0
BY - रविंद्र राऊत,युवा महाराष्ट्र लाइव – यवतमाळ |
दरोडा घालण्याच्या उद्देशाने लपुन बसलेल्या टोळीला काल रात्री पोलीसांनी मोठ्या शिताफीने टोळीच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले आहे.त्याना ताब्यात घेवुन त्यांच्या जवळून दरोडा घालण्याचे साहीत्य जप्त करण्यात आले.
काल स्थानिक गुन्हे शाखेचे पथक नाकाबंदी मोहीमेदरम्यान सराईत गुन्हेगार शोधण्याच्या दृष्टीने यवतमाळ शहर परिसरात पेट्रोलींग करीत असतांना काही संशयीत ईसम हे गोधणी रोडवरील जसमीत अपार्टमेंटसमोर तोंडाला रुमाल व गमछे बांधुन हातात रॉडसारख्या वस्तु घेवुन संशयास्पद स्थितीत बसलेले आहेत.पोलीस उपनिरिक्षक भोयर कर्मचाऱ्यांसह सदर ठिकाणी रवाना झाले. घटनास्थळावर छापा मारुन आरोपी नामे राजु किसन वाघाडे (35) व रा. पाटिपुरा फुकट नगर, कृष्ण उर्फ कान्हा मारोती घोसळकर (28) रा. सिंघानिया नगर , समीर उर्फ टुप्पी घनश्याम कुसराम वय (29 ) रा. सिंघानिया नगर , रुपेश उर्फ टावर बाबाराव गजलवार ( 38) रा. निखील नगर, उमरसरा, सुरज उर्फ लहाण्या गजानन मोहोड (34) रा. मोठे वडगांव यवतमाळ यांना ताब्यात घेवुन त्यांच्याकडून तोंडाला बांधुन असलेले गमछे, चाकु,.खंजर, लोखंडी रॉड, बांबु काठी, नायलॉन दोरी, मिरची पावडर  छऱ्याची गन असे साहित्य जप्त करण्यात आले.
सर्व ईसम हे गुन्हेगारी पार्श्वभुमीचे असल्याचे लक्षात आल्याने ते दरोडा टाकण्याच्या उद्देशाने पुर्वतयारीत असतांना मिळुन आल्याने त्यांच्याविरुध्द पोलीस स्टेशन अवधुतवाडी येथे कलम 399 भादवि. सह कलम 4/25 प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला. ही कामगीरी पोलीस अधिक्षक एम. राज कुमार, प्रदिप शिरस्कर, पोलीस निरीक्षक, स्था.गु.शा. यवतमाळ यांचे मागदर्शनाखाली पोउपनि मंगेश भोयर, ओमप्रकाष यादव, गजानन धात्रक, बंडू डांगे, गजानन डोंगरे, किरण पडघण, हरिष राउत, पोकॉ सुधीर पिदुरकर, महेश पांडे, गजानन हरणे, सुरेंद्र वाकोडे सर्व स्था.गु. शा. यवतमाळ यांनी पार पाडले


Post a comment

 
Top