0
BY - कुणाल शेलार ,युवा महाराष्ट्र लाइव – नांदेड |
आज नव्या पिढीला नव्या आणि सत्याच्या मार्गावर नेण्याचे महान कार्य महाराष्ट्रात गाजत असलेल्या देवा ग्रुप फाऊंडेशनने हाती घेतले असून गेले कित्येक वर्षे सामाजिक,शैक्षणिक चळवळीतून अन्याय अत्याचार विरोधी आवाज उठवून न्याय मिळवून देण्याचा मानस मिळाला आहे.सामाजिक कार्यात गोडी आणि युवा तरूणांची एकतेची जोडी ही हवीच.अशा एकतेचे प्रतीक म्हणून आज प्रत्येक गावागावातून जिल्हयात व महाराष्ट्रात देवा ग्रुप फाऊंडेशन हे नाव समोर आले आहे.
नेहमी आगळा वेगळा उपक्रम देवा ग्रुप फाऊंडेशन करित असून नांदेड जिल्हयात हा उपक्रम गणपती सणात पाहावयास मिळाला आहे.देवा ग्रुप फाऊंडेशनचे अध्यक्ष सुजितशेठ ढोले,सचिव तथा लाखो तरूणांचे लाडके मार्गदर्शक तानाजीभाऊ मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली नांदेड जिल्हा विभागीय देवा ग्रुप फाऊंडेशनच्या तरूणांनी गणेश बाप्पाच्या दर्शनाला जातांना हार घेऊन जातो तेव्हा विसर्जन वेळी ते हार फुल नदीपात्रात एका ठिकाणी जाऊन साचते त्यामुळे नदीपत्रात एकाठिकाणी त्याची साठवण होते आणि त्याचे उपयोग शुन्य होऊन जाते 
त्याचा उपयोग योग्य ठिकाणी आणि मदतीसाठी व्हावा या दृष्किोनातून नांदेड जिल्हा देवा ग्रुप फाऊेंडशन जिल्हाध्यक्ष मनमीत सिंह कुंजीवाले यांनी बाप्पाची क्षमा मागत आपल्या पदाधिकारी तरूणवर्गाची भेट घेऊन सदरहू बाप्पाच्या चरणी हार,श्रीफळ,फुल अर्पण न करता शालेय विद्दयार्थ्यांना लागणार्‍या वहृया,पेन,पेन्सिल अर्पण केले तर त्याचा उपयोग विद्दयार्थ्यांना नक्कीच होर्इल .त्यांच्या या विचाराला तरूण वर्गांचा पाठिंबा मिळाला व सचिव तानाजीभाऊ मोरे यांचा आशिर्वाद घेऊन शालेय वस्तुंना नांदेड जिल्हयातील मुकबधिर,अनाथाश्रम,व इतर शालेय विद्दयार्थ्यांना वाटण्याचा पहिलाच आगळा वेगळा उपक्रम यशस्वी केला.
नांदेड जिल्हयातील गणेश मंडळाच्या गणपती बाप्पाचे दर्शन घेणा-या कॉलेनीतील दर्शन घेणा-या भाविकांनीही दर्शन घेत बाप्पाच्या चरणी पेन,पेन्सिल,वहृया देऊन या सणाच्या माध्यमातून सामाजिक व शेक्षणिक कार्याला भरभरून प्रतिसाद दिला.बाप्पा चरणी शालेय वस्तु अर्पण करून नंतर त्या वस्तुंचे वाटप करण्यात आले.यावेळी मदत करणा-यांचे देवा ग्रुप फाऊंडेशनने धन्यवाद मानले.या उपक्रमात नांदेड जिल्हाध्यक्ष मनमीत सिंह कुंजीवाला,जिल्हा उपाध्यक्ष साहिल भुलेंगे,नांदेड जिल्हा दक्षिणाध्यक्ष अक्षय हंबर्डे,उत्तर अध्यक्ष विक्रम कदम पाटिल,नांदेड जिल्हा दक्षिण उपाध्यक्ष मनजित सिंह चौहान,नांदेड जिल्हा सहसचिव श्रीनिवास कोखुले व शेकडो पदाधिकारी यावेळी मोठया संख्येने सामील झाले होते.

Post a comment

 
Top