0
BY - युवा महाराष्ट्र लाइव - मुंबई |
शनिवारी सकाळी भारतीय सैन्यदलाच्या ताफ्यावर दहशतवाद्यांनी ग्रेनेड हल्ला केल्याची माहिती समोर येत आहे. जम्मू काश्मीर येथील रामबन भागात असणाऱ्या बटोट परिसरा ही घटना घडली.रामबन येथील वरिष्ठ पोलीस अधिक्षक अनिता शर्मा या इतर काही पोलीस अधिकाऱ्यांसोबत लगेचच घटनास्थळी पोहोचल्या. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार दहशतवाद्यांनी सैन्याच्या रोड ओपनिंग पार्टीवर Chakwa  कँप येथे हा हल्ला केला. सध्याच्या घडीला या हल्ल्यात कोणतीही हानी झाली नसल्याचं वृत्त आलेलं नाही. तसंच कोणालाही दुखापत झालेली नाही, अशी माहितीसुद्धा समोर येत आहे. असं असलं तरीही सैन्यदल, स्थानिक पोलीस यंत्रणा आणि इतर सुरक्षा यंत्रणा या भागात शोधमोहिमेत सहभागी झाले आहेत. 

Post a comment

 
Top