0
BY - युवा महाराष्ट्र लाइव – धुळे |
धुळे जिल्ह्यावर मागील दिवसात दोन मोठमोठ्या कुत्रीम घटनांनी अठ्ठावीस लोकांचा बळी घेतला असून, अनेक लोकांना अपघातात जखमी होवून दवाखान्यात उपचार घ्यावा लागत आहे. वरील घटनेतून मानवाच्या एका चुकीमुळे अनेकांना जीव गमवावा लागला असलातरी, मानव चुका करण्याचे सोडत नसल्यामुळे समाजात अशा चुकां करणाऱ्यांवर मोठा रोष निर्माण होत आहे. जोपर्यंत अशा चुका करणाऱ्यांवर कठोर कारवाई होत नाही, तोपर्यंत हे लोक सर्वसामान्यांचा जीव घेत राहतील, अशा सुर सध्या जनतेतून निघत आहे.धुळे जिल्ह्यातील दोंडाईचा गावाजवळ मागील काही दिवसांपूर्वी औरंगाबाद-शहादा बसचा अपघात होवून चौदा प्रवाशांचा जीव गेला होता. तर अनेक प्रवाशांना आपले अवयव निकामी होवुन काही महिने उपचार घ्यावा लागत आहे. आज ही चुक पाहिली तर, ती चुक वाहनांची म्हणता येणार नाही. कारण वाहन हे माणसाच्या दळणवळणाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी, माणसानेच बनविलेले एक महत्वाचे साधन आहे. मात्र ह्या साधनाचा, वाहनांचा योग्य वेग साधत प्रवास केला तर, ते माणसाच्या प्रगतीचे कारण आहे. अन्यथा वेग मर्यादा अति वाढवल्यास मनुष्याचा जीव घेण्याचेही कारण आहे. औरंगाबाद-शहादा बस अपघातात ज्या चौदा प्रवाशांचा जीव गेला. त्याला कारणीभूत दोघी वाहनाचे चालक होते. त्यांनी जर वेळ व वेग मर्यादाचे भान ठेवत वाहन चालवले असते तर प्रवाशांचा जीव वाचला असता. पण ते म्हणतात ना, चुक एकाची आणि शिक्षा सर्वांना भोगावी लागते. तसेच शिरपूर तालुक्यातील वाघाडी गावाजवळ केमिकल फॅक्टरीत झालेला स्फोट मानवी चुकांचे प्रतीक आहे. जर एखाद्या व्यक्तीला किंवा त्याच्या अखत्यारीतील फर्मला औषधे निर्मितीची कंपनी सुरू करायची आहे. तर त्यासाठी ती जागा योग्य आहे का..? तेथे परिपूर्ण परिसर त्यासारख्या कंपनीसाठी राखीव आहे का..? तेथून रहिवासी एरिया कोसो दुर आहे का..? कंपनी सुरू होण्यापूर्वी तेथे कामासाठी येणारी कर्मचारी यांच्या येण्या-जाण्याची व्यवस्था, काम करताना सुरक्षा, तेथे राहूनच काम करायचे असेल तर, राहण्याची व्यवस्था व सुरक्षा यासह अनेक नियम, अटींची पूर्तता केल्यावर कंपनी सुरू व्हायला परवानगी मिळते. आणि त्यातही अचानक काही समस्या उद्भवल्यास त्यासाठी कंपनीने कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी काय, काय ठोस उपाययोजना केल्या आहेत. यावर त्या कंपनीची परवानगी अवलंबून असते मात्र शिरपूर सारख्या गजबजलेल्या परिसरात व पाच किलोमीटर अंतरावर लागून असलेल्या वाघाडी-शिरपूर गावाच्या मध्येस्थानी शेती योग्य ग्रीनझोन प्लेस असतांना "रुमित केमिसिंथ" ह्या औषधांची केमिकल बनवणाऱ्या कंपनीला औद्योगिक वसाहत म्हणून परवानगी मिळालीच कशी..? हा प्रश्न सर्व सामान्य शिरपूरकर रहिवाशांना पडला आहे जर या परिसरात चुकीच्या कागदपत्रांच्या आधारे, वशिल्यावर, लोकप्रतिनीधींना हाताशी धरून, शासनाची फसवणूक करत. लाखो रुपये कमवण्यासाठी, सर्व सामान्य मजूर लोकांचे जीव घेण्याचा प्लॅन आखत कंपनी सुरू केली असेल तर अशा सर्वांनवर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल व्हायला हवा. जर याठिकाणी काम करणाऱ्या अधिकारी व मालक यांना वायू कळतीमुळे स्फोट होण्याची कल्पना होती. तर खबरदारी म्हणून कामगारांचे जीव वाचवण्यासाठी अहोरात्र मेहनत करत, वायू गळती रोखण्यासाठी ठोस उपाययोजना का केल्या नाही..? १४ कामगारांचे जीव जाण्या इतपत व ७२ लोकांच्या जखमी होण्याची वेळेची वाट पाहीली का..? कंपनी मालकाला एवढ्या मोठ्या अपघाताची शक्यता माहीत नव्हती का..? या सारखे अनेक प्रश्न मृत पावलेलेल्या लोकांचे नातेवाईक, शिरपूर व वाघाडी वासीय, व खासकरून धुळे जिल्ह्यातील जानकार नागरिकांच्या मनात उपस्थित होत आहे. जर येणाऱ्या काळात कंपनी मालक, एसटी महामंडळ, व तत्सम लोकांना रोजगार देणाऱ्या कंपन्यानी; लोकांचे जिव वाचवण्यासाठी  खबरदारी म्हणून वेळीच उपाययोजना न केल्यास "मानवी चुकामुळे" अपघातात अनेकांचे जिव जाण्याचे संकट धुळे जिल्ह्यावर कायस्वरुपी राहील. म्हणून अशा चुका करणाऱ्या कंपन्यांवर कठोर कार्यवाही करावी अशी मागणी जनतेतून जोर धरत आहे

Post a comment

 
Top