0
BY - नामदेव शेलार,युवा महाराष्ट्र लाइव – मुरबाड, ठाणे |
मुरबाडचं राजकारण आख्या महाराष्ट्रात नावलौकीक आहे.मुरबाडची एकता आणि इतिहासीकता यांची नाल जुडलेली आहे.प्रथम मुरबाडमध्ये घडतयं तेच राज्यात घडतंय हा इतिहास कोणीही विसरू शकणार नाही त्याची प्रचिती जवळ आली आहे.मुरबाड विधानसभा मतदार संघ कै.शांतारामभाऊ घोलपाच्या नावाने ओळखला जातोय राज्याचे महसुलमंत्री असताना त्यांनी केलेला विकास आणि सरकारमध्ये घेतलेले निर्णय राज्यातील गरीब कुळवहिवाटीला योगदान देवुन गेली मात्र त्या कालावधीत अखंड असलेली विधानसभा मतदार संघाची ताकद त्याच प्रमाणे आज झालेली मतदार संघाची फेर रचना  का घडली कशी घडली त्याचा परिणाम ग्रामीण भागावर कसा झाला याकडे येथील नेतृत्वाने सुध्दा लक्ष घातले नाही अन्यथा मुरबाड विधानसभा मतदार संघ कल्याणची 42 गांवे शहापुरची 22 गांवे आणि मुरबाडची 207 गांवे कायमस्वरूपी राहिली असती मुरबाड शहरी करणाशी जोडली गेली नसती.मुरबाड विधानसभा मतदार संघात यापुर्वी कल्याण ग्रामीणचे 32 हजारच्यावर मतदार शहापुरचे 42 हजाराच्यावर आणि मुरबाडचे 1 लाख 20 हजार असे मतदार होते त्यामुळे मुरबाडच्या स्थानिक उमेदवाराला कोणत्याही पक्ष उमेदवारी देत असे.कालांतराने मुरबाड विधानसभा मतदार संघातून शहापुरची 42 गांवे वगळली गेली आणि बदलापुर शहर आणि आंबरनाथ तालुक्याचा ग्रामीण भाग त्यामध्ये टाकण्यात आला त्यातुन बदलापुर आणि मुरबाडची बरोबरी झाली त्यातुन पक्षीय ताकदवानाना उमेदवारीची खेरात वाटप केली जावू लागली.मुरबाडचा सोबती कल्याण ग्रामीण भाग तसा विजयाचा शिल्पकार परंन्तू सेना भाजपा राष्ट्रवादी काँगे्रसला समसमान मतदान करणारा थोडेफार इकडे तिकडे मात्र लोकसभेच्या निवडणुकीत सेना भाजपा युतीचे पाटील आणि काँगे्रसचे टावरे यांना पडलेली मते त्यातच अपक्षानी घेतलेली मत कल्याण मधुन भाजपा वजाकरू शकते.अपक्ष नोटा तसेच काँगे्रसला पडलेली मते येत्या विधानसभेला कुठेही जावू शकतात अंतर्गत राजकीय पक्षातील बदल्या घडामोडी गटबाजी मुरबाड विधानसभेत आपला आमदार ठरवू शकतात.एकास एक उमेदवार प्रतिस्पर्धी राजकीय पक्षात आहेत.खरी लढत भाजपा राष्ट्रवादीत होर्इल मात्र कार्यकर्त्यांनी सामान्याची कामे केली नाही अवैध बांधकामे आपल्याच पक्षाच्या कार्यकर्त्यानी सामान्याची कामे केली नाही.अवैध बांधकामे आपल्याच पक्षाच्या कार्यकर्त्याशी खासदार आमदाराचा संवाद प्रशासनावर नसलेली पक्कड याचा फटका भाजपाला बसू शकतो दुसरीकडे शिवसेना भाजपा युती झाली किंवा नाही तरीही भाजपा सोबत कार्यकर्ता एकनिष्ठ असेल मात्र मतदार सर्वसामान्य समाजसेवक कार्यकर्ता योग्य वेळी योग्य निर्णय घेवून स्थानिक उमेदवाराना निवडू शकतात आताचा राजकारण जातीवर नाही तर मदतीच्या नेत्यापाठी जावू शकतो.

Post a comment

 
Top