0
BY – युवा महाराष्ट्र लाइव – पुणे |
पुण्यात मद्यपी ट्रक चालकाने पाच जणांना चिरडलं आहे. ही घटना आज (10 सप्टेंबर) रात्री 9 च्या दरम्यान मुळशी तालुक्यातील लवळे फाटा येथे घडली. या भीषण अपघातात (Accident) तीन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर दोनजण जखमी आहेत. जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात हलवण्यात आले आहे.पिरांगुट घाट उतारावर या भरधाव ट्रकने वाहनांना धडक दिली. या धडकेत तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे. ट्रक चालक दारु पिऊन गाडी चालवत असल्याचे समोर आलं आहे.

Post a comment

 
Top