0
BY - युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई  |
आगामी विधानसभा निवडणुका यशस्वीरित्या पार पाडण्याच्या दृष्टिकोनातून मुक्त आणि नि:पक्षपातीपणा, निवडणूक प्रक्रियेत अडथळा आणणाऱ्या कोणाचाही मुलाहिजा न बाळगणे, शांततेची काटेकोर अंमलबजावणी, सर्वसमावेशकता, सुलभ संपर्क, उमेदवार आणि प्रक्रियेतील घटकांकडून नितीमूल्यांची जपणूक आणि मतदार, सर्व समाजघटक तसेच राजकीय पक्षांचा सक्रीय सहभाग या सप्तसूत्रीला समोर ठेऊन काम करावे, असे आवाहन भारत निवडणूक आयोगाचे वरिष्ठ उपनिवडणूक आयुक्त उमेश सिन्हा यांनी आज केले.राज्यातील निवडणूक तयारीचा आढावा घेण्यासाठी श्री. सिन्हा यांच्यासह निवडणूक आयोगाचे अन्य उपनिवडणूक आयुक्त संदीप सक्सेना, सुदीप जैन, चंद्र भूषण कुमार, महासंचालक दिलीप शर्मा, धीरेंद्र ओझा मुंबईत आलेले आहेत. त्यांनी आज मुख्य सचिव यांच्या दालनात मुख्य निवडणूक अधिकारी बलदेव सिंह यांच्यासह अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी तसेच पोलीस अधिकाऱ्यांशी संपर्क साधून आढावा घेतला आणि सूचना दिल्या.

Post a comment

 
Top