BY - सुहास रेळेकर,युवा महाराष्ट्र लाइव – पुणे |
एक्स्प्रेस वेवर मध्यरात्री ओझर्डे गावच्या हद्दीत बस आणि कारचा भीषण
अपघात झाला आहे. खासगी बसने कारला मागून धडक दिल्यामुळे हा भीषण अपघात झाला. या भीषण
अपघांतामध्ये दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर अन्य दोन गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना
जवळील रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. मृतात एका डॉक्टरांचा समावेश असून
डॉ. केतन खुर्जेकर असे त्यांचे नाव आहे. या अपघातात डॉ. खुर्जेकर यांचे चालक ज्ञानेश्वस भोसले
यांचाही मृत्यू झाला आहे. या भीषण अपघातात जखमी झालेल्या डॉक्टरांची नावे जयेश पवार
आणि प्रमोद भिलारे अशी नावे आहेत.केतन खुर्जेकर हे संचेती हॉस्पिटलमधील अस्थीरोग तज्ज्ञ
होते. मुंबई येथे एका कार्यक्रमाला गेले होते. कार्यक्रम आटोपून माघारी येताना डॉ.
केतन खुर्जेकर यांच्या कारचा टायर पंक्चर झाला. टायर बदलण्यासाठी ते आपल्या चालकाला
मदत करत होते, त्याचवेळेस खासगी बसनं दोघांनाही उडवलं. आज डॉ. केतन खुर्जेकर यांचा
वाढदिवस होता, अशी माहिती खुर्जेकर यांचे मामेबंधू पुष्कर तुळजापूरकर यांनी दिली आहे.
Post a comment