0
BY - युवा महाराष्ट्र लाईव्ह -  राहुरी, अहमदनगर
राहुरी तालुक्यातील मुळा धरणात मायलेकरांचा बुडून मृत्यू झाला आहे. पूजा गणेश सातपुते (वय 36) आणि त्यांचा मुलगा ओंकार (वय 13) असे बुडून मृत्यू झाल्यांची नावं आहेत. बालिकाश्रम रोडवरील सिंधू मंगल कार्यालयासमोरील आराधना कॉलनीमधील ते रहिवाशी आहेत.सातपुते कुटुंब हे त्यांच्या आणखीन दोन मित्र कुटुंबाबरोबर मुळा धरण परिसरात रविवारची सुट्टी असल्याने फिरायला गेले असता. मुळा धरणात कमी असलेल्या पाण्यामध्ये ओंकार हा खेळत होता. ओंकारला पाण्याचा अंदाज न आल्याने तो बुडू लागला. हे पाहून ओंकारचे वडील गणेश त्याला वाचवण्यासाठी पाण्यात उतरले. परंतु गणेश यांना पोहता येत नव्हते. त्यामुळे तेही पाण्यात गटांगळ्या खाऊ लागले. पती गणेश हे पाण्यात बुडत असल्याचे पाहून त्यांची पत्नी पूजा पाण्यात उतरली आणि त्यांनी गणेश यांना पाण्यातून बाहेर काढले. ओंकार हा पाण्यामध्ये बुडत होता, त्याला वाचवण्यासाठी पूजा यापुढे पाण्यात उतरल्या. परंतु पूजा यांनाही खोल पाण्याचा अंदाज आला. ओंकार आणि पूजा या दोघांचाही पाण्यात बुडून मृत्यू झाला.

Post a comment

 
Top