0
BY - कुणाल शेलार,युवा महाराष्ट्र लाइव - मुंबर्इ |
     आज महिला कोण्त्याच क्षेत्रात कमी नाही,कोणत्याच बाबतीत मागे नसून उंच गगन भरारी घेण्यात सरस झाली आहेत.प्रत्येक महिलांनी भारत भुमिसाठी विविध क्षेत्रातून कार्य करत असताना सामाजिक कार्याचा वाटा सिंहाची गर्जना करणारा केंद्रबिंदू ठरला आहे.समाजातील तळागळातील जनसामान्यांच्या सेवेसी अहोरात्र कार्यशीलपणे न्याय मिळवून देण्यासाठी तृप्ती देसार्इ,ज्योतीतार्इ शेलार नाव महाराष्ट्रात चांगलेच चर्चेत ठरले आहे.अशा महिलांसोबत महाराष्ट्रातून सामाजिक चळवळीत समाजकार्याची सेवा करणार्‍याचे विविध महिलांसोबत समाजसेविका म्हणून सौ.नितातार्इ कृष्णा खोत हे नाव महिलांची साथ म्हणून ओळखले जाऊ लागले आहे.नेहमी त्यांनी विविध प्रश्‍नांवर अन्यायाला वाचा फोडून अनेकांना न्याय मिळवून दिला आहे.जात,पात,धर्म न बाळगता माणूसकीच सर्वस्व असल्याचे विचार प्रकटीकरणात आणले.समाजसेविका तृप्ती देसार्इ,सौ.ज्योतीतार्इ शेलार सारख्या नेहमी सौ.नितातार्इ खोत या जनसामान्य लोकांमध्ये त्यांच्याच स्तरावर जाऊन जिद्दीने,चिकाटीने महिला वर्गांसाठी एक पाऊल पुढे घेत कित्येक कामे शासन दरबारी करून दिल्या आहे.त्यांची ओम सार्इराम सेवाभावी ट्रस्ट असून जिजाऊ महिला विकास मंडळाच्या संस्थापक अध्यक्ष म्हणून कार्य पाहत आहेत.
याच माध्यमातून गोरगरिबांसाठी त्यांनी सदैव मदतीचा हात दिला आहे.त्यांच्या याच कार्याची धरपड पाहून रयत क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राज्यमंत्री नामदार सदाभाऊ खोत यांनी ओम सार्इराम सेवाभावी ट्रस्ट असून जिजाऊ महिला विकास मंडळाच्या संस्थापक अध्यक्षा सौ.नितातार्इ कृष्णा खोत यांची रयत क्रांती महिला आघाडीच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष पदी निवड केली असून त्यांना नामदार सदाभाऊ खोत यांच्या प्रमुख उपस्थितीत त्यांना निवड पत्र देऊन तळागळातील महिलांच्या समस्या सोडविण्यासाठी जबाबदारी सोपविण्यात आली आहे.त्यांच्या पुढिल वाटचालीस युवा महाराष्ट्र लार्इव्ह वृत्तवाहिनी,स्वप्नज्योती टार्इम्स वृत्तपत्र,मुरबाड विकासमंच कडून शुभेच्छा देण्यात आले आहे.


Post a comment

 
Top