0
BY – युवा महाराष्ट्र लाइव – नागपूर |
शहराच्या विविध भागातील झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या नागरिकांना स्वत:च्या मालकीचे घराचे स्वप्न साकार व्हावे यासाठी पट्टे वाटपाची प्रक्रिया सुलभ करण्यात आली असून झोपडपट्टीधारकांना राहत असलेल्या जागेचे नोंदणी केलेले पट्ट्यांचे वाटप तत्काळ करण्याच्या सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिल्या.
रामगिरी येथे खामला, रामबाग, बोरकर नगर, सरस्वती नगर येथील झोपडपट्ट्यांमध्ये राहणाऱ्या नागरिकांना नोंदणी केलेल्या पट्ट्यांचे वाटप मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी महापौर श्रीमती नंदा जिचकार,जिल्हाधिकारी अश्विन मुद्गल, महानगरपालिका आयुक्त अभिजित बांगर, स्वयंसेवी संस्थेच्या प्रतिनिधी लिना बुधे, नगरसेवक प्रकाश भोयर, पल्लवी शामकुळे, विजय चेटुले, लखन येरावार प्रामुख्याने उपस्थित होते.झोपडपट्ट्यात राहणाऱ्या नागरिकांना मालकी हक्काचे पट्टे मिळावे यासाठी सर्व नियम शिथिल करण्यात आले असून पात्र ठरणाऱ्या प्रत्येक पट्टेधारकांना मालकी हक्काचे पट्टे तात्काळ उपलब्ध करुन देण्याचे निर्देशही अधिकाऱ्यांना मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.                     

Post a comment

 
Top