0
BY – युवा महाराष्ट्र लाइव – नवी दिल्ली |
चंद्राच्या पृष्ठभागापासून काही अंतरावर असतानाच चांद्रयान-2 मोहिमेतील विक्रम लँडरचा संपर्क तुटला होता. यानंतर इस्त्रोच्या शास्त्रज्ञांसह सर्वांनाच दुःख झाले होते. मात्र, काही तासांच्या अथक प्रयत्नानंतर विक्रम लँडरचे ठिकाण शोधण्यात इस्त्रोला यश आले आहे. 
चंद्रावर विक्रम लँडरचे ठिकाण सापडले आहे. इस्त्रोचे प्रमुख के. सिवान यांनी ही आनंदवार्ता दिली आहे. ऑर्बिटरने लँडरचे फोटो काढले असून संपर्क झालेला नाही, अशी माहिती सिवान यांनी दिली. मात्र लवकरच आम्ही विक्रम लँडरशी संपर्क साधू, असे के. शिवन यांनी सांगितले आहे.

Post a comment

 
Top