0
BY - नामदेव शेलार,युवा महाराष्ट्र लाइव – मुरबाड, ठाणे |
राज्यात आज गणेशोत्सवाचा उत्साह आहे. गणपती बाप्पा हे संपूर्ण महाराष्ट्राचे लाडके दैवत आहे. आज थाटामाटात बाप्पांचे आगमन होत आहे. संपूर्ण राज्यात बाप्पांच्या आगमनाचा उत्साह ओसंडून वाहताना दिसतोय. आज गणरायाची प्रतिष्ठापना केल्यानंतर पुढील दहा दिवस प्रत्येकजण लाडक्या बाप्पाच्या भक्तीरसात रंगून जाणार आहे. बाजारपेठांमध्येही गणेशोत्सवाचा उत्साह मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. तसेच ठाणे जिल्हयातील मुरबाड तालुक्यातील आमदार किसनराव कथोरे विकासमंच ट्रस्टच्या अध्यक्षा तथा युवा महाराष्ट्र लार्इव्ह वृत्तवाहिनीचे वृत्तसंपादीका सौ.ज्योती नामदेव शेलार यांच्या घरी सोन्याचा मुकूटधारी नवसाला पावणार्‍या बाप्पाचे आगमन मोठया थाटामाठात झाले.
घरघरांत, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांमध्ये जल्लोषात बाप्पांचं स्वागत केले जात आहे. ढोल-ताशांचा गजर, गुलाल, फुलांच्या उधळणीमध्ये बाप्पांचे घरोघरी आगमन होत आहे. मुंबईचा राजा अशी ओळख असणाऱ्या गणेश गल्लीचा राजा आणि नवसाला पावणाराअशी ख्याती असलेल्या सिद्धिविनायकची प्राणप्रतिष्ठा पहाटेच करण्यात आली. बाप्पांची पहिली आरतीही संपन्न झाली आहे. तर मुंबईचा मानाचा गणपती म्हणून ओळख असणाऱ्या सिद्धिविनायकमध्ये पहिल्याच दिवशी मोठी गर्दी पाहायला मिळाली. बाप्पाच्या दर्शनासाठी भाविकांनी पहाटेपासूनच रंग लावल्या आहेत.

Post a comment

 
Top