0
BY - कुणाल शेलार ,युवा महाराष्ट्र लाइव - ओतुर |
 मन रमते प्रत्येकाचे आणि दिवस होतो आनंदी,चोही बाजु घुमतो आवाज आतुरता त्याच क्षणाची असे म्हण्अत आपण अशा क्षणाची वाट पाहत असतो की ज्या क्षणानी आपण क्षणभंगुर होतो.असाच क्षण जेव्हा विद्दयार्थी असताना येतो तेव्हा खर्‍या अर्थाने जिवन जगण्याचा अर्थ मिळतो आणि यशस्वी वाटचाल गरूड झेप घेते.अशीच वाटचाल सध्या फार्मसी शिक्षण घेत असलेल्या विद्दयार्थ्यांनी वर्ल्ड फार्मासिस्ट डे दिवशी अनुभवला आणि मार्गदर्शकांच्या मनोगतात त्यांची वैशिष्टय जाणून घेतली.पुर्ण जिल्हयातील ओतुर येथे 25 सप्टेंबर 2019 रोजी इंटरनॅशनल फार्मासुटिकल फेडरेशन आयोजीत श्री.गजानन महाराज शिक्षण मंडळाचे शरदचंद्र पवार कॉलेज व इस्न्टिटयुट ऑफ फार्मसी महाविद्दयालयाने " वर्ल्ड फार्मासिस्ट डे " साजरा केला.सदर कार्यक्रमात फेडरेशन ऑफ फार्मसीकडून महाविद्दयालयांना 2019 वर्षाचे विषय म्हणून " सेफ अ‍ॅन्ड इफेक्टीव्ह मेडिसीन फॉर ऑल " दिला असून त्या मागील हेतू म्हणजे ग्रामीण भागातील अशिक्षीत ग्रामस्थांसाठी किंवा ग्रामस्थांच्या घराघरात फार्मासिस्ट पाहोचावा व औषधांची पुर्णतः माहिती त्यांच्यापर्यंत पाहोचावी व त्यांच्या औषधा विषयाच्या अडचणी दुर व्हाव्यात म्हणून 25 सप्टेंबर या दिवशी निवड करण्यात आली.
कार्यक्रमांतर्गत महाविद्दयालयाच्या विद्दयार्थ्यांंनी ओतुर परिसरातील ग्रामस्थांना भोंदुगिरी करून लुबाडणार्‍या तांत्रिकापासून सावधान,नकली औषध गोळया विकणार्‍यापासून सावधान व स्वतःच्या मनाने आजारांवर औषध उपचार या गोष्टी कशा टाळाव्यात या विषयावर प्रभात फेरी घोषणाबाजी,पथनाटय सादर केली.तसेच ओतुर गावातील औषध विकणार्‍यांना गुलाब,पुष्प देऊन त्यांचा सत्कार देखील विद्दयार्थ्यांच्या माध्यमातून करण्यात आला.सदर कार्यक्रमात ओतुर सरपंच संतोषशेठ तांबे,महाविद्दयालयाचे मानद सचिव श्री.वैभवशेठ तांबे,महाविद्दयालयाचे प्राचार्य डॉ.गणेश दामा उपस्थित होते.सरपंच श्री.संतोषशेठ तांबे यांनी विद्दयार्थ्यांनी केलेल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल आभार व्यक्त केले तसेच महाविद्दयालयाच्या प्राचार्यांनी विद्दयार्थ्यांना औषध निर्माता कसा असावा व त्याने ग्रामस्थापर्यंत कशा पध्दतीने पोहोचावं या विषयावर मार्गदर्शन केले.ग्रामस्थांकडून पथनाटय सादर करणार्‍या विद्दयार्थ्यांचा सत्कार देखील करण्यात आला.आयोजीत कार्यक्रम नियोजनरित्या व यशस्वीपणे पुर्ण करण्यासाठी महाविद्दयालयाचे प्रा.सुनिल हारेर,प्रा.जयंत बिडकर,प्रा.देव्हडराव नितीन,प्रा.अस्मिता गायकवाड,प्रा.चिवडशेट्टी निर्मला,प्रा.अजिंक्य दिघे,प्रा.वृषाली भोत,प्रा.मंगल शेळके,प्रा.विजय वाकळे,प्रा.नितीन आहेर,प्रा.किरण महाजन आदिंचे सहकार्य अमुल्य मोलाचे लाभले आहे.


Post a comment

 
Top