0
BY - गौरव शेलार,युवा महाराष्ट्र लाइव – मुरबाड, ठाणे |
मुरबाड नगरपंचायत (Murbad Nagarpanchayat) हद्दीतील वार्ड क्रमांक 8 येथील मुख्य रस्त्यालगत एकाच रात्री दोन गाळयांचे बांधकाम अज्ञांत व्यक्तीने केल्याची खळबळजनक घटना मुरबाड नगरतपंचायत हद्दीत घडली आहे.ही घटना समजताच प्रभाग क्रंमाक 8च्या नगरसेविका यांनी मुरबाड नगरपंचायत(Murbad Nagarpanchayat) कार्यालयात चौकशी केली असता या बांधकामाची नोंद नसल्याचे दिसुन आले आहे.अशा बेकायदा बांधकामाची कारवार्इ आपल्या पदाला भोवूनये म्हणुन प्रभाग क्रंमाक 8च्या नगरसेविका यांनी मुरबाड नगरपंचायतीचे मुख्याअधिकारी यांच्याकडे तक्रार केली आहे.मात्र या बेकायदा बांधकामावर मुरबाड नगरपंचायत काय करवार्इ करते की तोंडाला गुलुप लाऊन गप्पा बसते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.नगरपंचायतीनी मिाहती घेवून  राजकीय दबावाने कानावर हात ठेवले आहेत संबधीत कर्मचार्‍यांवर कारवार्इ व्हावी अशी मागणी जोरधरू लागली आहे.तसेच मुरबाड नगरपंचायत हद्दीत अनाधिकृत बांधकामे सरास झाली आहेत त्यांच्यावर कारवार्इ करण्यासाठी नगरपंचायतीचे सिओ कंकड दुर्लक्ष करत आहे.शासनानी मुरबाड नगरपंचायतीची चौकशी र्इडी मार्फत करावी अशी मागणी आता होत आहे.

Post a comment

 
Top