0
BY - कुणाल शेलार ,युवा महाराष्ट्र लाइव - मुरबाड |
गेल्या काही दिवसापासून मुरबाड तालुक्यात गुटखा विक्रीचा विषय जोमाने सुरू असून या गुटखा विक्रीला दुजोरा मिळत आहे.गुटखा डिलरने आपला धंदा दिवसेंदिवस वाढवण्याचा मानस मुरबाड पोलिस ठाण्याच्या हद्दीत मिळवला असून मशिनीतील गुटखा मुरबाड हद्दीतील गोडावूनमधून बनवून विकण्याचा कारनामा सध्या ओघीत चालवला आहे.याकडे तक्रार केली तरच प्रशासन जागे होर्इल असे सोंग सध्या घेण्याचा मुलमंत्र धरला असून मुरबाड पोलिस यंत्रणा या गुटखा डिलरचे पाठिराखे झाले असल्याचे चौकशी,पाहणी व बातमीची दखल न घेता कारवार्इ शुन्य समजून समोर आले आहे.मशिनीतून पोत्यातील गुटखा दुकानाच्या टेबलाबर,पानटपरी दिसतो परंतू पोलिसांचे धाडस होत नाही त्यावर चौकशी करण्याचे.म्हणजे प्रशासन डगमळीत जात चालले आहे असेच म्हणावे लागेल.हप्तेबाजीला बांधून ठेवलेल्या गुटखा डिलर दोनशे,पाचशेचा खेळ सोडून गड्डीचा खेळ करू लागला आहे.सक्षमच जेव्हा भक्षम होतात आणि भय जेव्हा निर्भय होतो तेव्हा प्रशासनाची भुमिका गटोरीत बांधली जात आहे असे चित्र सध्या मुरबाडमध्ये घडत आहे.कायद्दयाची पायमल्ली केली जात असल्याने झोपेचे सोंग घेणार्‍या पोलिस प्रशासनाला गुटखा डिलर हप्तेबाजीमुळे आवडु लागला आहे.बातमी आल्यास गुटखा डिलर हप्तेबाजीत वाढ केली जात असल्याची चर्चा होत असून पोलिसांनीही याकडे दुर्लक्ष करत बातम्या लावा आमची पोळी आणि आमच्या पॉकीटातील नोट वाढत आहे असेच म्हणावे लागेल.जेव्हा नागरिक तक्रार करेल तेव्हाच आम्ही महाराष्ट्राचे सक्षम प्रशासक आहोत हे सिध्द करण्याचे प्रयत्न करतात परंतु सर्वसामान्यांच्या विषयाकडे दुर्लक्ष करून अवैध धंदयाकदे जादा लक्ष दिले जात आहे.प्रशासनातील अधिकार्‍यांना शासनाचा मानधन,पगार पुरत नसल्याने अवैध धंद्दयाकडे वळणा लागली असून गुटखा धंदा व अन्य धंदयाकडे लक्ष आकर्षुण वेधले जात आहे.याकडे शासनाने दुर्लक्ष केले असून मुरबाडच्या गुटखा डिलरवर कारवार्इ करण्यास ना हरकत असल्याचे दाखवत आहे.बातमी आली टपरी वर हप्ता चालू होतो आणि डिलरचा हप्ता वरिष्ठ अधिकार्‍यांना मिळत असतो.त्यामुळे अवैध धंदा वाढो कि कमी हो माझा हप्ता मला वेळेवर मिळालाच पाहिजे अशी धमकीही कदाचित देत असेल अशी शंका नाकारता येणार नाही.त्यामुळे मुरबाडच्या मशिनीतील गुटखा डिलर बनावट करून विकतो आणि मिल बाट के खिलाऊँगा असा कारनामा सध्या मुरबाडचा गुटखा डिलर करत आहे. ( क्रमशः भाग - 1 उर्वरित पुढिल भागात मुरबाडच्या गुटखा डिलरची साखळी वाचा फक्त युवा महाराष्ट्र लार्इव्ह पोलखोल वृत्तवाहिनीमध्ये )


Post a comment

 
Top