0
BY – युवा महाराष्ट्र लाइव – नाशिक |
सभासदांच्या कल्याणासाठी आणि राज्याच्या वैभवासाठी सहकार क्षेत्र समृद्ध होणे आवश्यक असून या क्षेत्राच्या प्रगतीसाठी पदाधिकारी आणि सदस्यांनी सहकारी संस्थेचे विश्वस्त म्हणून काम करावे, असे आवाहन सहकार,मदत व पुनर्वसन मंत्री सुभाष देशमुख यांनी  केले.
महाराष्ट्र शासनाच्या सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागातर्फे आयोजित सहकार पुरस्कार 2017-18 वितरण सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी खासदार भारती पवार, आमदार देवयानी फरांदे, सीमा हिरे, सहकार आयुक्त व निबंधक सतीश सोनी, पणन संचालक डॉ. किशोर तोष्णीवाल, राज्य सहकारी बँकेच्या प्रशासकीय समितीचे सदस्य अविनाश महागावकर, विभागीय सहनिबंधक (लेखा परीक्षण)आर.सी.शाह आणि जिल्हा उपनिबंधक गौतम बलसाणे  आदी उपस्थित होते.

Post a comment

 
Top