0
BY - रविंद्र राऊत,युवा महाराष्ट्र लाइव – यवतमाळ |
येथील पत्रकार कपील शामकुंवर यांनी पुरस्कारात मिळालेली रोख रक्कम शेतकरी व समाजातील गरजू वंचीताना अर्पण करून आगळा वेगळा आदर्श निर्माण केला आहे.हा अनुभव एका छोटे कामी कार्यक्रमात आम्हाला अनुभवायला मिळाला. यवतमाळातील प्रिंट मिडिया असो की इलेक्ट्रॉनिक मीडिया यवतमाळातील पत्रकार मंडळींनी आपले आदराचं स्थान निर्माण केलंय आहे. त्यांच पैकी एक नाव म्हणजे समाजाच्या बाबतीत संवेदनशील पत्रकार  कपिल शामकुंवर आहेत.
एबीपी माझा वृत्त वाहिनीचे यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी म्हणून कार्य करीत असलेल्या कपिल शामकुंवर यांना नुकतेच  मुख्यमंत्र्यांच्या हस्ते राज्य स्तरीय पु. ल. देशपांडे उत्कृष्ट दूरचित्रवाणी वृत्तकथा पत्रकारिता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यांना सन्मानपत्र व रोख पन्नास हजार रुपये मिळाले नक्कीच हा यवतमाळच्या पत्रकारितेचा गौरव आहे.विशेष म्हणजे त्यांनी हा पुरस्कार जिल्ह्यातील गरीब गरजू लोकांना समर्पित केला. पुरस्कार स्वरूप मिळालेली पन्नास हजार रुपयांची रक्कम गरजूंना मदत करण्याचा संकल्प केला.  दिनांक २ सप्टेंबर सोमवार रोजी शासकीय विश्राम यवतमाळ येथे संकल्पपूर्तीही करण्यात आली.
त्यांनी ही रक्कम जिल्हाधिकारी कार्यालासमोर फळ केळी विकून स्वाभिमानी आयुष्य जगणारे दिव्यांग असलेले सचिन हातागळे,दहेली येथील शेतकरी पती व मुलाने आत्महत्या केलेल्या कुटुंबातील माऊली श्रीमती गंगाबाई चौधरी, भुलाई येथील शेतमजूर विनायक भोयर यांना शेळी पालन करिता आर्थिक मदत,हरसूल येथील वृद्ध कलावंत जीजाबाई भगत यांना रेडिओ व रोशनी भगत नामक होतकरू विद्यार्थिनीला शिलाई मशीन, घाटंजी येथील विद्यार्थ्याना स्पर्धा परीक्षा तयारीसाठी पुस्तके, यवतमाळच्या एका कॅन्सर रुग्णाला आर्थिक मदत अशा विविध गरजवंताना मदतीचा हात दिला.
या कार्यक्रमाला ज्योती कॅन्सर रिलीफ सेंटरचे सतीष मुस्कंदे, पत्रकार अविनाश साबापुरे, भास्कर मेहरे, विवेक गावंडे, सूरज पाटील,रुपेश उत्तरवार, रवि राऊत,विलास राऊत,आकाश सोमोसे यांचे हस्ते सदर मदत प्रदान करण्यात आली.

Post a comment

 
Top