0
BY - गौरव शेलार,युवा महाराष्ट्र लाइव - अहमदनगर |
लहुजी शक्ती सेनेचे जिल्हा कार्याध्यक्ष तसेच सामाजिक कार्यकर्ते सुनील सकट यांना कोल्हापुर येथील क्रांतीगुरू लहुजी वस्ताद साळवे प्रतिष्ठानच्या वतीने गौरव पुरस्कार मिळाल्याबद्दल शिवसेनेच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी शिवसेनेचे उपनेते अनिल राठोड समवेत लहुजी शक्ती सेनेचे शहर संपर्क प्रमुख किरण शिंदे,बल्ल सचदेव,शिवसेना अल्पसंख्याक शहर प्रमुख जावेद सय्यद,संतोष उमाप,रावसाहेब डाके,राहुल ठोकळ आदी उपस्थित होते.सुनिल सकट हे अहमदनगरचे रहिवासी असुन त्यानी समाजात कंखर अशी समाजसेवा केला आहे व करत आहेत समाजसेवा ही इश्‍वर सेवा असे त्यांनी आमच्याशी बोलतांना सांगितले.

Post a comment

 
Top