0
BY - युवा महाराष्ट्र लाईव्ह – नवी दिल्‍ली 
सध्या कांद्याचे वाढते दर सामान्यांना चांगलेच रडवत आहेत. राजधानी दिल्लीतील आजादपूर बाजारात  कांद्याचा घाऊक भाव ५० रुपये प्रति किलो इतका झाला आहे. हा भाव २०१५ नंतर सर्वाधिक आहे. आशियातील सर्वात मोठा कांद्याचा बाजार महाराष्ट्रातील लासलगांवमध्ये भरतो. येथेही कांदा ५० रुपये प्रति किलो विकला जात आहे.देशात कांद्याची टंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे बाजारामध्ये आवक कमी होत आहे. आवक कमी झाल्यामुळे कांद्याचे दर वाढत असल्याचे व्यापारांनी सांगितले आहे. मात्र, असे असले तरी शेतकऱ्याला कमी भावात कांदा बाजारात घालावा लागत आहे. दिल्लीतील आजादपूर बाजाराचे व्यापारी आणि कांदा व्यापारी संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र शर्मा यांनी सांगितले, दक्षिण भारतातील राज्यांत मुसळधार पावसामुळे कांद्याचे पीक खराब झाले आणि नवीन पीक तयार होण्यास विलंब होण्याची शक्यता असल्याने कांद्यांच्या किंमतीत वाढ होत आहे.

Post a comment

 
Top