BY – युवा महाराष्ट्र लाइव – नवी दिल्ली |
महसूल उत्पन्नासाठी दंडात वाढ केली नसून लोकांचे जीव वाचवण्यासाठी वाढ
केली आहे, असं मत केंद्रीय रस्ते, वाहतूक मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी
पत्रकारांशी संवाद साधताना व्यक्त केलं.देशात नवीन मोटार वाहन कायदा लागू झाल्यापासून वाहतुकीच्या
नियमांमध्ये बदल झाले आहेत. या नव्या नियमांना नागिरकांमधून विरोध होत आहेत. त्यासोबतच
काही राज्यांनी हा वाहतूक नियम लागू करण्यासाठी विरोध दर्शवला आहे. तर गुजरातमधील राज्य
सरकारने मोटार वाहन कायद्यात बदल करून दंडाच्या रकमेत घट केली आहे.
Post a comment