0
BY - युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई |
महाराष्ट्र, हरियाणा आणि झारखंड अशा तीन राज्यांमध्ये भारतीय निवडणूक आयोग विधानसभा निवडणुकीची घोषणा आज करण्याची शक्यता आहे. विधानसभा निवडणूक 2014 ची घोषणा 20 सप्टेंबर 2019 रोजी करण्यात आली होती. तर या निवडणुकीसाठी 15 ऑक्टोबर रोजी मतदान पार पडून 19 ऑक्टोबर 2019 या दिवशी मतमोजणी पार पडली होती. विद्यमान राज्य सरकारचा कार्यकाळही पुढच्या महिन्यात संपत आहे. त्यामुळे भारतीय निवडणूक आयोग महाराष्ट्र विधानसभा निवडणूक तारखा आणि आचारसंहिता लागू झाल्याची आज करू शकतो. महाराष्ट्र आणि हरियाणा राज्यातील निवडणुका या झारखंड राज्याच्या आधी घेतल्या जाऊ शकतात.महाराष्ट्र विधानसभेसाठी एकूण 288 जागांसाठी निवडणूक होते. तर हरियाणा आणि झारखंड राज्यांमध्ये अनुक्रमे 90 आणि 82 जागांवर निवडणुका होतात. सन 2014 मध्ये या तिन्ही राज्यांमध्ये थोड्याफार फरकाने विधानसभा निवडणुका समांतर कालावधीतच पार पडल्या होत्या. त्यामुळे या राज्यांतील राज्य सरकारांचा कार्यकाळही थोड्याफार फरकाने समांतर कालावधीतच पार पडतो आहे. त्यामुळे या तिन्ही राज्यांत सरकारचा कार्यकाळ संपण्यापूर्वी निवडणुका जाहीर होणे आवश्यक आहे.

Post a comment

 
Top