0
BY – युवा महाराष्ट्र लाइव – डोंबिवली |
कल्याण डोंबिवलीमध्ये वाहतूक कोंडी आणि खड्ड्यांमुळे नागरिक हैराण झाले आहेत. गणेशोत्सवादरम्यान खड्डे बुजवले जातील अशी नागरिकांना आशा होती. मात्र रस्त्यावर खड्यांची संख्या वाढत गेली. मनसे प्रमुख राज ठाकरे शनिवारी (7 सप्टेंबर) डोंबिवलीत आले आणि त्यांना खड्ड्यांमुळे वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला. यावर मनसे आक्रमक झाली आहे. मनसेने या आधीही खड्ड्यांसाठी केडीएमसी महानगर पालिकेला खड्डे रत्न पुरस्कार दिला होता. मात्र राज ठाकरे यांना वाहतूक कोंडीचा फटका बसला. त्यानंतर मनसेने पत्रकार परिषद घेत भाजप आमदार आणि राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांच्यावर निशाणा साधला.डोंबिवलीत येणाऱ्या काळात 471 कोटींचे रस्ते होणार अशी घोषणा राज्यमंत्र्यांनी केली होती. ही घोषणा फक्त निवडणुकीच्या तोंडावर दाखविण्यात आलेलं गाजर असल्याचा आरोप मनसेने केला आहे.

Post a comment

 
Top