0
BY - युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई |
गेल्या दोन दिवसांपासून मुंबईसह उपनगरांमध्ये जोरदार पाऊस कोसळत होता. सोमवारपासून कोसळणाऱ्या या पावसाचा जोर मध्यरात्रीपासून ओसरला आहे. मुसळधार पावसामुळे मुंबईतील तिन्ही मार्गांवरील लोकल सेवा विस्कळीत झाली होती. आता पावसाचा जोर कमी झाल्याने लोकल वाहतूक पूर्वपदावर येत आहे. यामुळे मुंबईकरांनी काही प्रमाणात सुटकेचा निश्वास टाकला आहे.

Post a comment

 
Top