मुख्यमंत्र्यांची
महाजनादेश यात्रा सर्वसामान्य लोकांना त्रासदायक आहे. सरकार दडपशाही करतंय. अशा
शब्दात राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश
यात्रेवर ताशेरे ओढले आहेत. बारामती पंचायत समितीच्या वतीने आयोजित केलेल्या
शिक्षक पुरस्कार सोहळ्याच्या वेळी त्या बोलत होत्या. यावेळी बोलताना शनिवारी
महाजनादेश यात्रेत बारामतीत झालेल्या गोंधळावर त्यांनी प्रशासन व सरकार वर टीका
केली. सरकार दडपशाही करतंय. बारामतीत जो लाठीचार्ज झाला त्याची चौकशी व्हायला हवी.
लोकांना साधं घोषणा द्यायचं ही स्वातंत्र्य नाही. त्यामुळे कालच्या लाठीचार्जचा मी
निषेध करते असे त्या म्हणाल्या.
Subscribe to:
Post Comments (Atom)
Post a comment