0
BY – युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई  |
बांबूपासून गणपती तयार करण्याची स्पर्धा चंद्रपूर जिल्ह्यातील चिचपल्ली स्थित "बांबू संशोधन आणि प्रशिक्षण केंद्राने आयोजित केली. "आपला बांबू गणपती" या  स्पर्धेत चंद्रपूरातील १५ शाळातील १०५ विद्यार्थ्यांसह शाळांमधील शिक्षकांनीही यात सहभाग घेतला.विद्यार्थ्यांच्या हातातील ही कला थक्क करणारी असून यामुळे पर्यावरण रक्षणाचे बीज त्यांच्या मनात रुजले जाईल, असा विश्वास वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला आहे.बांबूच्या मुळापासून, टाकाऊ बांबूपासून बांबूच्या सुबक आणि सुंदर मूर्ती विद्यार्थ्यांनी घडवल्या. त्यांनी तयार केलेल्या बांबूच्या गणेशमूर्तींनी राज्यभरातील गणेशभक्ताचे मनही जिंकून घेतले आहे.

Post a comment

 
Top