‘ प्राण जाए परंतु वचन न जाए ’ अशा शब्दाला
जागृत ठेवणारे महाराष्ट्र राज्याचे आरोग्यमंत्री तथा ठाणे जिल्हा पालकमंत्री एकनाथ
शिंदे यांना आज ठाणे येथील टेंभीनाका येथील शिवसेना कार्यालयात शेकडोने कंत्राटी आरोग्य
परिचारिका महिलांनी आपल्या विविध मागण्या मान्य करण्याहेतुने निवेदन दिले.यावेळी
समस्त सर्व महिलांना न्याय देण्याचे आश्वासन दिले असून महिलांनी आपले आझाद मैदानावरील
उपोषण मागे घेतले असून आरोग्यमंञ्यांच्या शब्दांचा मान राखून विश्वास संपादन केला
आहे.त्यामुळे महाराष्ट्रातील 5 ते 7 हजार महिलांनी
उपोषण स्थगित केले आहे.आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वेळात वेळ काढून महिलांच्या
समस्यांना गांभिर्यतेने दखल घेतली असून आरोग्य महिलांना न्याय मिळणार असून सर्वत्र
महिलांनी आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे,मुरबाड
विकासमंच ट्रस्टीच्या अध्यक्षा सौ.ज्योतीतार्इ
शेलार ज्यांनी महिलांच्या समस्या आपल्या भावनिक भावनेच्या माध्यमातून शासनसमोर
मांडले तसेच प्रत्येक क्षणाची बातमी शासनापर्यंत पोहोचवून आम्हाला साथ दिली अशा ‘ युवा महाराष्ट्र लार्इव्ह वृत्तवाहिनेचे ’
आभार मानले आहे.
Post a comment