0
BY - सुहास रेळेकर,युवा महाराष्ट्र लाइव – पुणे |
महाराष्ट्रातील गडकोट किल्ले हे तमाम देशवासीयांची अस्मिता आहे. गडकोट किल्ल्यांबाबतच्या खासगीकरणाबाबत मुख्यमंत्र्यांनी राज्यातील जनतेची जाहिर माफी मागावी. तसेच गडकोट किल्ल्यांचे खासगीकरण करण्याचा निर्णय ताबडतोब मागे घ्यावा, अन्यथा मंत्र्यांना राज्यात फिरू दिले जाणार नाही, असा इशारा राष्ट्रवादी कॉंग्रेस पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष संजोग वाघेरे-पाटील यांनी दिला. 
राज्य सरकारने घेतलेल्या गडकोट किल्ल्यांच्या खासगीकरणाच्या निर्णयाच्या निषेधार्थ पिंपरी चिंचवड राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या वतीने डांगे चौक थेरगाव येथे शनिवारी (7 सप्टेंबर 2019) आंदोलन करण्यात आले. या वेळी राष्ट्रवादी शहर युवक अध्यक्ष विशाल वाकडकर, राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉ. शैलेश मोहिते, राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष रविकांत वरपे, विरोधी पक्षनेते विठ्ठल उर्फ नाना काटे, माजी नगरसेवक प्रशांत शितोळे, सतीश दरेकर, प्रदेश संघटक विशाल काळभोर, राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष सुनील गव्हाणे, शहर राष्ट्रवादी युवक कार्याध्यक्ष योगेश गवळी, संतोष वाघेरे उपाध्यक्ष, बाळासाहेब पिल्लेवार, अभिषेक आल्हाट, प्रतिक साळुंखे, शादाब खान, गोरक्षनाथ पाषाणकर, कुणाल थोपटे, अक्षय माचरे, सनी डहाळे, मजर खान, सर्फराज शेख, निखिल दळवी, वेदांत माळी, चैतन्य चोरडीया, अमोल पाटील, आशिष रोकडे आदी उपस्थित होते.
विशाल वाकडकर म्हणाले की, राज्यातील गडकोट किल्ल्यांचे संवर्धन करणे ही राज्यसरकारची जबाबदारी आहे. परंतू मागील पाच वर्षात केंद्र व राज्य सरकार बेरोजगार युवकांना रोजगार उपलब्ध करून देऊ शकले नाही. त्यामुळे आता या गडकोट किल्ल्यांवर पर्यटनाच्या नावाखाली खासगीकरण करण्याचे शासनाचे धोरण दिसत आहे. त्यामुळे राज्यातील 25 किल्ले हेरिटेज हॉटेल व लग्न समारंभासाठी भाड्याने देण्याचा निर्णय पर्यटन राज्यमंत्र्यांनी जाहिर केला आहे. राज्यातील तमाम जनतेचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांच्या नेतृत्वाखाली हजारो मावळ्यांनी स्वराज्यात आपले बलिदान देऊन या गडकोट किल्ल्यांचे रक्षण केले आहे. अनेक वर्ष लढा देऊन देखील औरंगजेबाला हे किल्ले मिळवता आले नाहीत. हे किल्ले म्हणजे राज्यातील जनतेची अस्मिता आहे. येथे एकही वीट राज्य सरकारला उभारू देणार नाही. किल्ल्यांचे खासगीकरण करण्याचा निर्णय घेण्याचे धाडस सरकारने केले तर राष्ट्रवादी युवक राज्यभर रस्त्यावर उतरून आंदोलन करतील, असा इशारा राष्ट्रवादी युवक शहराध्यक्ष विशाल वाकडकर यांनी दिला. 

Post a comment

 
Top