0
BY - नामदेव शेलार,युवा महाराष्ट्र लाइव – मुरबाड, ठाणे |
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका पार पडत आहेत स्वताला नेते समजणारे आज मताची भिक मागतील ज्यांनी दिली त्यांच्यापासून लांब राहातील आणि ज्यांनी विरोधात काम केलं त्यांच्यावर राग काढतील अशा परंपरेला वरिष्ठ पक्ष नेतृत्वाने लगाम घातली पाहिजे.आज विधानसभा निवडणुकीत गेलेला पैसा वसुली पुन्हा चार वर्षे करतील एक वर्षे पक्षवाढीकडे लक्ष देतील पुन्हा दारात मताची भिक मागण्यास येतील त्यापेक्षा लोकशाहीत कोणी कोणाच्या बरोबर असुदया जय पराजय पचवण्याची क्षमता असणार्‍या आणि राग रोष क्रोध पचवून बिपी वाढवणार्‍यांना उमेदवारी नसावी अशी मतदाराची इच्छा असते मात्र सत्तेसाठी पैसा आणि साम्राज्य पाहिले जाते याचं दुख महाराष्ट्रातील जनता भोगत आहे.महाराष्ट्रातील राजकारणात बद्दल घडत नाही मात्र सत्तेच्या सिहांसनात चढउत्तार होताना दिसतंय चार दिवस सासुचे चार दिवस सुनेचे हे राजकारणाचे सुत्र त्यांच्याच कुटूंबासाठी म्हणजे हे राजकीय पक्ष कुटूंब आहेत.त्यामुळे त्यांनी जनतेकडुन जमवलेला पैसा त्यातुन केलेली कामे म्हणजे त्यांच्या मालकीचा विकास समजला जातो या बद्दल अनेक मतदार शेतकर्‍यांनी खंत व्यक्त केली आहे.प्रत्येक पाच वर्षात उमेदवाराचा मतदार संघ बदलुन उमेदवारी दिली पाहिजे कारण लोकप्रतिनिधी आमदाराना तेवढा पगार आहे.एककडे आमदार खासदारापेक्षा अधिकारी कर्मचार्‍यांना पगार कमी आहे.त्यांच्या बदल्या तीन वर्षाने होतात मग एकच आमदार खासदार यांना प्रत्येक पांच वर्षांनी मतदार संघ बदलुन उमेदवारी देण्यास हवी तुम्ही आयुष्यभर एकाच मतदार संघात ठाण मांडून मुलाबाळाना कौठुंबीकासह सत्तासिहांसनावर कब्जा करतात त्यांचा परिणाम सामान्य जनतेवर होतंय तुम्हीच लढा पिढयानंपिढया मात्र मतदार संघ बदला दुसर्‍यांना संधी दयावी अशी भुमिका सर्वच पक्षाच्या नेत्यांनी घेतल्यास राजकारण् लोकशाहीला घातक ठरणार नाही.निवडणूका संपल्यावर विरोधात होता म्हणुन राग काढणार पोलिस शासकीय अधिकार्‍यांना हाताशी धरून खोटे गुन्हे हाणामार्‍या विविध प्रसंगी त्रास देतील अशा राजकारणातील निवडणुका आज सुरू झाल्या उदया संपतील पुन्हा हे उतावळे होतील


Post a comment

 
Top