0
BY - युवा महाराष्ट्र लाइव - ठाणे |
पीएमसी बँक बुडाली आणि सामान्य नागरिक देशोधडीला लागले. हाल अपेष्टा भोगून जमा केलेला पैसा अडकल्याने सर्वत्र आक्रोश पाहायला मिळत आहे. जन आक्रोशाला आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांची साथ मिळाली असून या सगळ्याला युतीचे बडे नेतेच जबाबदार असल्याचे त्यांनी सांगितले. बुडालेल्या पीएमसी बँकेचे संचालक भाजपचे आमदार सरदार तारासिंग यांचा मुलगा असल्याचे त्याच्यावर कारवाई कधी होणार? असा सवाल त्यांनी केला. शिवसेनेचे रवींद्र वायकर यांच्या मातोश्री क्लबने पीएमसी बँकेत असलेले करोडो रुपये आधीच काढून घेतले. याचा अर्थ त्यांना या सर्व प्रकरणाची माहिती होती. मात्र, सामान्य गरिबांनाच कोणी वालीच राहिला नसल्याचा आरोप आव्हाड यांनी केला. 

Post a comment

 
Top